Teacher Recruitment 2025: नमस्कार, जर का तुम्ही देखील कोणत्याही नोकरीच्या शोधात असाल आणि तुम्हाला नोकरी मिळत नसेल तर आता तुमच्या सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे.
कारण राज्यामध्ये शिक्षक भरती ही निघालेली आहे त्यामध्ये राज्यातील खाजगी, अनुदानित तसेच जिल्हा परिषद नगरपालिका आणि महापालिका यामध्ये शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा हा 20 जानेवारीपासून सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या तारखेनंतर पवित्र पोर्टलवर देखील जाहिरात अपलोड करण्यास प्रारंभ होणार आहे
10,000 शिक्षकांची भरती
शालेय शिक्षण विभागाने लवकरात लवकर भरतीची प्रक्रिया सुरू करावी यासाठी पवित्र पोर्टल विकसित करण्याचे काम हे तल्लीसमा कॉर्पोरेट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला दिला आहे.
यामध्ये जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका या शाळांसह खाजगी शाळांमध्ये आणि अनुदानित शाळांमध्ये देखील शिक्षकांची रिक्त पदे भरली जाणार आहेत. Teacher Recruitment 2025
या सर्व गोष्टींचे नियोजन करण्यात आला असून 20 जानेवारी या तारखेपासून पवित्र पोर्टलवर रिक्त पदांच्या जाहिराती अपलोड करण्यास सुरुवात करण्यात येणार आहे.
जाणून घ्या अर्ज करण्याची तारीख
शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी राज्यात शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्यातील कारवाई लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.
राज्यामध्ये जवळपास पंधरा ते वीस हजार शिक्षकांची भरती ही पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यामध्ये करण्यात येणार आहे. आणि राहिलेल्या दुसऱ्या टप्प्यात दहा हजार शिक्षकांची भरती करण्यात येणार आहे.
शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विविध मुद्द्यांचा आढावा घेण्यासाठी शिक्षण विभागातील उच्च माध्यमिक तसेच राज्य माध्यमिक मंडळात बैठक घेतली आहे. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी देखील संवाद साधला आहे. Teacher Recruitment 2025
यावेळेस शालेय शिक्षण संस्थेचे आयुक्त चंद्र प्रतापसिंह, राज्य शैक्षणिक संशोधन व परीक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावर, शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते.
शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सांगितले की, शिक्षण भरती करण्यासाठी संच मान्यता तसेच पट पडताळणी देखील केली जाईल, यामुळे नेमक्या रिक्त जागा किती आहेत हे स्पष्ट होईल.
तसेच पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातून वंचित राहिलेल्या सर्व उमेदवारांना देखील पुन्हा संधी मिळणार आहे.
अधिक माहिती
शिक्षण आयुक्त सचंद्र प्रतापसिंह यांनी दुसऱ्या टप्प्यातील भरतीसाठी, अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2020 नुसार कार्यवाही पूर्ण केली आहे. Teacher Recruitment 2025
तसेच पोर्टलवर जाहिरातीची नोंदणी सुविधाही सोमवारपासून सुरू केली जाणार आहे. यामुळे जिल्हा परिषदेखाडील उर्वरित रिक्त जागा आणि अपात्र उमेदवार किंवा गैरहजर किंवा परीक्षेसाठी रुजू न झालेले उमेदवार यांच्यावर देखील विचार करण्यात येणार असल्याचा सांगितला आहे.