PF Account Transfer Process : जर तुम्ही देखील खाजगी क्षेत्रामध्ये काम करत असाल आणि तुम्ही एक पीएफ खातेधारक असाल तर आजची ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे. कारण (EPFO) म्हणजेच कर्मचारी भविष्य निधी संघटनेने सर्व पीएफ खातेधारकांसाठी एक सर्वोत्तम निर्णय घेतला आहे.
या संघटनेने पीएफ कर्मचाऱ्यांकरिता प्रायव्हेट फंड म्हणजेच PF अकाउंट ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया ही एकदम सोपी केली आहे. आज आपण या संदर्भात जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला देखील तुमचे पीएफ अकाउंट ट्रान्सफर करायचे असेल तर ते कसे करणार ते पाहू.
EPFO चा नवीन निर्णय
या संदर्भात कर्मचारी भविष्य निधी संघटनेने एक परिपत्रक देखील जारी केला आहे. त्यांच्या या परिपत्रकाच्या अनुसार आता तुम्हाला तुमचे पीएफ खाते ट्रान्सफर करण्याकरता तुम्हाला जुन्या किंवा नवीन कंपनीला ऑनलाइन अर्ज पाठवण्याची अजिबात ही गरज पडणार नाही. PF Account Transfer Process
जर तुम्ही खाजगी कंपनीमध्ये काम करत असाल तर तुम्हाला पीएफ म्हणजेच प्रायव्हेट फंड काय आहे हे माहीतच असेल. जो पण कर्मचारी खाजगी क्षेत्रामध्ये किंवा कोणत्या कंपनीमध्ये काम करत असतो त्यावेळेस त्याच्या पगारातील 12 टक्के रक्कम ही पीएफ खात्यामध्ये जात असते.
एवढेच नव्हे तर तुमच्या त्या पीएफ अकाउंट मध्ये तुम्ही ज्या कंपनीमध्ये काम करत आहात ती कंपनी देखील तेवढीच रक्कम भरत असते. PF Account Transfer Process
कंपनीमार्फत त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी जमा होणाऱ्या पीएफ मध्ये 8.33% हा भाग कर्मचाऱ्यांच्या पेन्शन मध्ये जातो तर 3.67% हा भाग काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पीएफ मध्ये जात असतो.
EPFO पीएफ अकाउंट ट्रान्सफर प्रोसेस
याच सर्व संदर्भात आता ई पी एफ ओ कडून दिनांक 15 जानेवारी 2025 या रोजी एक परिपत्रक काढण्यात आला आहे. त्यांच्या या परिपत्रकानुसार, आता तुम्हाला जुने कंपनीने नवीन कंपनीला ऑनलाईन अर्ज पाठवण्याची कोणतीही आणि कसलीही गरज नाही.
स्वतः पीएफ खातेधारकच स्वतःचे खाते ट्रान्सफर करण्यासाठी ईपीएफओ कडे विनंती करू शकतात, यामुळे आता कर्मचाऱ्यांनी जर कोणती कंपनी सोडून दुसऱ्या कंपनीमध्ये जॉइनिंग केलं तर कर्मचारी स्वतः त्याचे पीएफ खाते ट्रान्सफर करू शकतो.
या निर्णयामुळे पीएफ खातेधारकांना मात्र आता चांगलाच दिलासा मिळणार आहे कारण, ज्यावेळेस कर्मचारी कंपनी सोडून दुसऱ्या कंपनीमध्ये जॉईन होत असतो त्यावेळेस काही कंपन्या त्यांचे पीएफ अकाउंट दुसऱ्या कंपनीमध्ये ट्रान्सफर करण्यासाठी खूप वेळ लावत असतात.
हीच गोष्ट लक्षात घेऊन आता ईपीएफओ कडून पीएफ खातेधारकांसाठी ही नवीन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे ज्यामुळे पीएफ कर्मचाऱ्यांचे हाल कमी होण्यास मदत मिळणार आहे. PF Account Transfer Process
तर मग तुम्हाला ईपीएफओ कडून सुरू करण्यात आलेली ही नवीन प्रक्रिया कशी वाटली तुम्ही आम्हाला कमेंट द्वारे प्रतिक्रिया देऊ शकता आणि जर.
अशाच प्रकारची नवनवीन माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर आत्ताच साईटला दिसत असलेले टेलिग्राम चे बटन वरती क्लिक करून चॅनलला जॉईन करून घ्या. जेणेकरून अशीच महत्त्वाचे आणि रोजचे अपडेट तुम्हाला सर्वात पहिल्यांदा पाहायला मिळेल.