8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगास केंद्र सरकारच्या वतीने नुकतीच मंजुरी दिली आहे. आणि तसेच आठव्या वेतन आयोगाला २०२६ पर्यंत सर्व अहवाल सादर करण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत. यामुळे आता सरकारी कर्मचाऱ्यांची मात्र बल्ले बल्ले होणार आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार येणारे वर्ष म्हणजे 2026 पर्यंत आठवे वेतन आयोग हे हरित सर आणि सर्वांसाठी लागू केलं जाऊ शकतं. आठवे वेतन आयोग कधी लागणार याची आतुरता सर्वच सरकारी कर्मचाऱ्यांना लागली होती, आता त्यांची ही प्रतीक्षा मात्र पूर्ण होणार असल्याचा दिसत आहे. 8th Pay Commission
कारण येणाऱ्या 2026 वर्षापासून आठवे वेतन आयोग सुरू होण्याच्या हालचाली केंद्र सरकारमध्ये सुरू झाले आहेत. आठवे वेतन आयोग सुरू झाल्यानंतर मात्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारांमध्ये तसेच जे कर्मचारी पेन्शन घेत आहेत त्यांच्या देखील पेन्शनमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
8 वा वेतन आयोग
ज्यावेळेस सातवा वेतन आयोग लागू झाला होता त्यावेळेस त्याचा फिटमेंट फॅक्टर हा 1.86 वरून 2.57 यावरती पोहोचला होता. हा फिटमेंट फॅक्टर वाढला की कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होते जसे की जर कोणाला 7000 रुपये पगार मिळत असेल तर त्याचा पगार डायरेक्ट 18 हजार रुपयांवर पोहोचला असेल.
एवढेच नाही तर फिटमेंट फॅक्टर वाढल्याने सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये देखील वाढ होते, पेन्शनचा आकडा हा किमान 9000 रुपयांवर पोहोचला होता. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना मात्र चांगलाच दिलासा मिळाला होता. 8th Pay Commission
ज्यावेळेस नवा वेतन आयोग लागू होईल त्यावेळेस फिटमेंट फॅक्टर हा 2.57 वरून डायरेक्ट 2.86 वर जाऊन पोहोचू शकतो. याच कारणामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात प्रचंड प्रमाणात वाढ होणार आहे.
8 वा वेतन आयोग लागू होताच पगारात वाढ
एवढेच नव्हे तर या नव्या वेतन आयोगाचा परिणाम हा सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनवर देखील होणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये देखील वाढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मिळालेल्या अंदाजानुसार जर एखाद्या सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन हे 18 हजार रुपये असेल तर मात्र त्याचं नवीन वेतन आयोग लागू झाल्यानंतर हेच वेतन थेट 51 हजार 480 रुपयांवर जाणारा असल्याचा सांगण्यात येत आहे. 8th Pay Commission
आणि रिटायरमेंट सरकारी कर्मचारी किंवा निवृत्तीवेतनधारकांसाठी जर पहिल्यांदा 9000 रुपये मिळत असेल तर आता ते वाढून निवृत्ती धारकांसाठी दरमहा पेन्शनचा हप्ता हा 25 हजार 740 रुपयांवर पोहोचणार आहे.
फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय
फिटमेंट फॅक्टर हा सरकारी कर्मचाऱ्यांच्या आणि तसेच पेन्शन धारकांना मिळणाऱ्या रकमेचा आकडा सुनिश्चित करण्यासाठी हा फॅक्टर एक महत्त्वाची भूमिका बजावत असतो.
प्रत्येक दहा वर्षानंतर नवा वेतन आयोग हा लागू होत असतो, या आयोगात नवनवीन तरतुदींमुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात बदल देखील पाहायला मिळतात. 8th Pay Commission
त्यामुळे येणाऱ्या काळात जर नवीन वेतन आयोग लागू झाला तर मात्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शन धारकांना या नवीन वेतनाचा प्रचंड प्रमाणात फायदा मिळणार आहे हे मात्र शंभर टक्के खरं आहे.
त्यासाठी जर तुम्हाला अशा प्रकारचे नवीन नवीन गोष्टी शिकायचे असतील आणि नवीन अपडेट त्वरित मिळवायचे असेल तर साईटला दिसत असलेल्या टेलिग्राम बटन ला आत्ताच जॉईन करा म्हणजे नवीन गोष्टी सर्वात अगोदर तुम्हाला शिकायला मिळतील.